ज्येष्ठ काँग्रेस नेते भानुदास कोतकर यांचे निधन ; अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार क्षेत्रात शोककळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

कोतकर यांनी राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रात दीर्घकाळ काम केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून आणि कृषी क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment