अहमदनगर जिल्ह्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना, महिलेचा….

संगमनेर शहरातील विवाहित महिला मनीषा कढणे भरतीसाठी प्रयत्न करत होती. संसाराचा गाडा हाकत तिने आपल्या स्वप्नाचा पाठलाग सुरू ठेवला होता. मनीषाने वनरक्षक पदाची लेखी परीक्षा पास केली होती.

आता फक्त शारीरिक चाचणीची परीक्षा राहिली होती, रोजच्याप्रमाणे मनीषा सरावासाठी मैदानात गेली होती. नेहमीप्रमाणे तिने मैदानात दोन राऊंड मारले.

मनीषाने ग्राऊंडला फेऱ्या मारल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला. त्यानंतर तिथेच खाली बसली अन् काही वेळात ती खाली कोसळली. जवळपास असलेल्या लोकांनी तिला पाहिल्यावर तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं.

कोणालाच काही समजलं नाही नेमकं काय झालं? रूग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासल्यावर तिला मृत घोषित केलं. गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर ही घटना घडली. मनीषाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चंदनापुरी येथे मनीषावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषाला एक लहान मुलगा असून तिच्या अचानक जाण्याने कढणे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment