माढ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत वाढल्याचं बोललं जात आहे. उत्तम जाणकर यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला होता, त्यानंतर आता शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
भाजपकडून माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले धैर्यशिल मोहिते पाटील यांनी त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आलीय. त्यामुळे आता माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे.
मात्र माढ्यात महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आधी धैर्यशिल मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांना महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर उत्तम जाणकर यांनी देखील शरद पवार गटाला पाठिंबा दिला तर आता शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
