भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसंच हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार, या दोन्ही राज्यांमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे.
तर ६ ऑक्टोबरला निकाल असणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.
