आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज आहे.
नाशिक, नाशिक घाट, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर रायगड, पालघर, अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे ही दोन्ही जिल्ह्याला आज पावसाचा अंदाज नाही. या दोन्ही जिल्ह्यातील वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
