मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
कर्क : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
सिंह : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : काही कामे धाडसाने पार पाडाल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.
तुळ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
वृश्चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
धनु : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
