शिंदे गटाच्या चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या चारचाकी वाहनास किनोद -जळगाव दरम्यान गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली.यात आमदारांच्या गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.
या जबर धडकेत, अपघातात सुदैवाने विद्यमान आमदार लताताई सोनवणे (Latatai Sonwane) व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे हे दैव बलवत्तर होते म्हणून बालबाल बचावले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे हे आज (दि २७) रोजी कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोनवणे यांच्या हस्ते होता.
भूमिपूजन कार्यक्रम आटोपून संध्याकाळी त्यांच्या खाजगी वाहनाने चोपडा येथून (वाहन क्रमांक एम एच १९/बी यु ९९९) खेडीभोकरी भोकर मार्गे जळगाव येथे जात असताना किनोद गावापुढे जळगांव कडून गौण खनिज वाहणाऱ्या डंपरने (डंपर क्रमांक एम एच १९/ झेड ६२४५) जोरदार धडक आमदारांच्या गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.
यात आमदारांचे खाजगी वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या धडकेत गाडीत बसलेले आमदार लताताई सोनवणे यांना मुकामार लागला असून, माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांना किंचित दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
