महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री…

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवारमहाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभावनात दाखल झाले आहेत, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत.

याशिवाय, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे इतर काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment