मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केला होता. त्यानंतर आज एकनाथ शिंदे पुण्यात चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी हजर राहिले नव्हते.
यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. मात्र या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी अजित पवार यांनी “विरोध पक्षनेते हे महत्वाचं पद आहे. त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे,” असे वडेट्टीवारांना सुनावले. तर मूख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांबाबत ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नसल्याने आराम करण्यासाठी ते त्यांच्या मुळगावी गेले आहेत.
त्यामुळे ते आजच्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा कोणीही करु नये.”
