शरद पवार आणि अजितदादांची गुप्त भेट, देवेंद्र फडणवीस म्हणाले 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्कमध्ये चोरडिया या बड्या उद्योगपतींच्या निवासस्थानी गुप्त भेट घेतली होती. यावेळी शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील उपस्थित होते…

प्रसिद्ध उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार उपस्थित असताना अजित पवारही या बंगल्यावर जातानाचे दृष्य अनेक वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामध्ये कैद झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीबाबत मला काहीही माहिती नाही, त्याबाबतचा कोणताही तपशील माझ्याकडे नाही. भेट झाली, नाही झाली, किती वेळ झाली यासंदर्भातील कोणतीही माहिती माझ्याकडे नसल्याने मी तुमच्या ज्ञानामध्ये कोणतीही भर टाकू शकत नाही, मी त्याला सक्षम नाही”, असे फडणवीस यांनी म्हटले.

तसेच माध्यम प्रतिनिधींनी फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, “मला याबाबत काहीही माहित नाही. जर उद्या असेल तर नक्की कळवतो,” असे म्हटले.

Leave a Comment