Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, पारनेरला आ.लंके यांच्या रूपाने सुवर्ण….

पारनेर : आ. निलेश लंके(Nilesh lanke) यांनी पारनेर-नगर मतदारसंघाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून पारनेर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. करोना काळात हजारो लोकांना जीवनदान देऊन अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उपक्रम राबवत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.

संघर्षशील पारनेरला आ. लंके यांच्या रूपाने सुवर्ण माणूस लाभला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार(Sharad Pawar) यांनी आ. लंके यांच्या कार्याचा गौरव कौतुक केले.

पारनेर-नगरचे आ. लंके यांच्या वाढदिवस व निघोज ग्रामीण पतसंस्थेच्या नामकराच्या निमित्ताने खा. पवार शुक्रवारी निघोज येथे आले होते.

यावेळी आ. लंके यांच्यावतीने सात हजार विद्यार्थीना सायकल वाटप, शंभर घरकुले व 50 व्यावसारिक वाहनाचे वाटप खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. पवार बोलत होते

Leave a Comment