मोठी बातमी! पुण्यासह ‘या’ सात जिल्ह्यात अलर्ट जारी 

पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान झाले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.९) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, ही प्रणाली आज (ता. ९) निवळून जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान आणि ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ९) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. तर रायगड, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Comment