जरांगे पाटील यांनी दिली प्रकृतीबाबत मोठी अपडेट 

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता.

मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले होतं. अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली, शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र उपोषण मागे घेतानाच त्यांनी सरकारला आरक्षणासाठी नवी डेडलाईन दिली आहे.

दरम्यान उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी आता स्वत:च आपल्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

आज महत्त्वाच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. उद्या कदाचित मला डिसचार्ज मिळेल. उद्या दहा वाजेपर्यंत मी रुग्णालयातून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment