पिंपरी चिंचवड : रुग्णवाहिकेतून गांजाची बिनधास्तपणे विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गांजा तस्करी करणाऱ्यांचं मोठं रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोट्यवधीचा गांजा पकडला असून आरोपींनाही बेड्या ठोकल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन वर्षांपासून गांजा तस्कर अँब्युलन्स मधून गांजाची तस्करी करत होते. पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाई नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्याच मोठं अहवान पोलिसांसमोर होतं. रुग्णवाहिकेसाठी ट्रॅफिकमधूनही वाट मोकळी करुन दिली जाते. याशिवाय रुग्णवाहिकेची तपासणी होत नाही त्याचाच फायदा गांजा तस्करांनी घेतला.
पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आमली पदार्थ विरोधी पथकाला या तस्करी बाबत माहिती मिळाली आणि अखेर या तस्करांच्या मसुक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींनी अँब्युलन्समध्ये लपून ठेवलेला तब्बल 96 किलो गांजा आणि एकूण 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
कृष्णा मारोती शिंदे, देवीप्रसाद सीताराम डूकळे आणि सौरव निर्मल या तीन मुख्य आरोपीसह इतर तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या या कारवाईच अँब्युलन्स चालकांनी स्वागत तर केलंच शिवाय यापुढे कुठल्याही गुन्हेगारांनी अँब्युलन्स चा वापर करून नये यासाठी कायदे अधिक कठोर करण्याची मागणी केली आहे.
