मेष : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल.महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
मकर : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
