जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी खुलताबादमध्ये बेमुदत संप

खुलताबाद – शासनाने जुनी पेंशन योजना तात्काळ लागू करावी यासाठी आज दि.14 मार्च पासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या बंद ला खुलताबाद शहर आणि तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी अकरा वाजता शहरातील आणि तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खुलताबाद तहसीलदार यांना निवेदन देवून आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहचावा अशी भावनिक साद घातली.

या संपात राष्ट्रवादी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मुप्टा शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, शिक्षक सेना, खुलताबाद शिक्षक जुनी पेंशन हक्क समिती, खाजगी शिक्षक संस्था, शिक्षक संघ अशा सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या.

याप्रसंगी शिक्षक समितीचे सतिश कोळी, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश हिवर्डे, संजय ठुबे, अण्णासाहेब निकम, प्रविण डघळे, राजाभाऊ वायाळ, सोमसिंग देवरे, तैय्यब पठाण, कमलाकर व्यवहारे, रुबाब तडवी, महेश काळे, राहुल चाटसे, सुनिल जाधव, कलीम शेख, सुनिल पाटील, कैलास कांजूने, राजू बारगळ, तैय्यब पठाण, एस.बी. पाटील, अर्चना हजारे, पल्लवी जाधव यांच्यासह मनोहर गावंडे, शशिकांत सुतार, शेखर कटकर, राजेंद्र लहाने, गुरुदेव संमतभद्र विद्यालयाचे गंगवाल, सचिन अन्नदाते, राजमाता जिजाऊ आश्रमशाळाचे दिनेश पाटील, राजश्री पाटील, रवींद्र पाटील, सुनिता लोंढे, सुवर्णा पवार, अमोल तांकडे, रामदास भोये, संतोष चोंदे, मनिषा चव्हाण, विजय राठोड, सुषमा पवार, विजय राठोड आदिसह तालुक्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते.

Leave a Comment