Amruta pawar : राष्ट्रवादीला धक्का, अमृता पवार भाजपमध्ये….

माजी खासदार स्व. वसंतराव पवार यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार(Amruta pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

अमृता पवार या आर्किटेक्ट असून त्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार यांच्या सुकन्या आहे. त्याचप्रमाणे त्या नाशिक जिल्हा परिषद सदस्या व गोदावरी अर्बन को. ऑप. बॅकेच्या विद्यमान अध्यक्षा आहे.

मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निलीमा पवार यांच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर अमृता पवार काहीशा नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद जिल्हयात वाढायला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या प्रवेश सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment