अहमदनगर(DSNews24/सुनिल नजन) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे येथील कुख्यात डॉन असलेल्या आरोपीच्या विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण (बारा) डझनभर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅडहोकेट मनिषा राजाराम आढाव आणि राजाराम जयवंत आढाव या वकिल दाम्पत्याचा पाच लाखाच्या खंडणीसाठी पंचवीस जानेवारी२०२४ रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी म्रुतदेह उंबरे येथील स्मशानभूमीतील विहीरीत टाकून दिले होते.
अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील टीमने दोनच दिवसात छडा लाउन एकूण पाच पैकी चार आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले आहे.पाचवा आरोपीही लवकरच सापडणार आहे असे सांगितले आहे.म्हणून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात एलसीबीच्या टीमचे कौतुक करण्यात येत आहे.
आढाव वकिल दाम्पत्याच्या खून प्रकरणी मुख्य १)आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाउ दुशिंग (वय३२) राहणार उंबरे तालुका राहुरी ,२) भैय्या उर्फ सागर साहेबराव खांदे(वय२३) राहणार येवले आखाडा, तालुका राहुरी,३)शुभम संजीत महाडिक, (वय२५)राहणार गणपत वाडी शाळेजवळ, मानोरी,तालुका राहुरी,४) हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय२०) राहणार उंबरे, तालुका राहुरी,५)बबन सुनिल मोरे ,राहणार उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या संशयीत आरोपीच्या विरोधात लवकरच न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात येणार आहे.मुख्य संशयीत आरोपी असलेल्या किरण उर्फ दत्तात्रय नानाभाउ दुशिंग यांच्या विरोधात पुर्वी अनेक पोलिस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.
(१)सन दोन हजार बारा साली पहिला गुन्हा प्रथम राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३२८/२०१२ कलम ४५७,३८०,५११,३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.(२) राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं.६९/२०१३ कलम४५४, ४५७,३८०,(३) संगमनेर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं.१७८/२०१३ कलम ३०२,३४, (४) राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३१४/२०१६ कलम ३९२,३४, (५) राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं.१७७/२०१८ कलम ३८४,(६) वावी, नाशिक, ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.१८७/२०१८ कलम ३९४,४१४,५०६,३४,(७) संगमनेर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गु्.र.नं. १३५/२०१९ कलम ३०२,३२८,२०१,३६४, १२०ब,३४,(८) वडनेर भैरवनाथ ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३७/२०२२ कलम ३७९,३४,(९) संगमनेर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. १६५/२०२२ कलम ३६४अ,३८४,३९७,३४ आर्म अॅक्ट३/२५,(१०)यवत, पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.४४३/२०१७ कलम ३९२,३४,५०६,(११) राहुरी पोलिस स्टेशनमध्येगु.र.नं. ८१७/२०२३ कलम २९५, २९५अ, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४,(१२) राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं.७५/२०२४ कलम ३०२,३६३,२०१ ईत्यादी प्रकारचे डझनभर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
दिनेश आहेर यांच्या एल सी बी च्या टीम मध्ये मनोज गोसावी, चंद्रकांत कुसळकर, गणेश भिंगारदीवे, संभाजी कोतकर, सचिन आडबल, मेघराज कोल्हे, दत्तात्रय गव्हाणे, प्रशांत राठोड,सागर ससाणे,अम्रुत आढाव, संदिप पवार हे होते.
राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, कर्तव्य दक्ष पोलीस अंमलदार चंद्रकांत बर्हाटे , एपीआय लोखंडे,पो.काॅं.नवगिरे आणि पालवे यांनी तपासात महत्वाची कामगिरी बजावली होती.
