आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीमध्ये काहींना बढतीची शक्यता.

 

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

 

तुळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन परिचय होतील.

 

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

 

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

 

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कुंभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

 

मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Leave a Comment