खांबे – वरवंडी शिवाच्या रस्त्यावर उसाचा ट्रक पेटला, चालक ठार

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या खांबे – वरवंडी शिवाच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला तर चालक संतोष राणू मोटे ( वय 45) हे जागेवर ठार झाल्याची घटना घडलीय.

सविस्तर माहिती अशी कि , शेरी चिखलठाण वरुन एम एच 14 बी जे 2251 या क्रमांकाची ट्रक ऊस भरुन संगमनेर साखर कारखान्याकडे जात असताना खांबे – वरवंडी शिवा जवळील रस्ता क्रोस करुन गेलेल्या विदयुत वाहिनी ( तार ) ऊसाने भरलेला ट्रकचे घर्षण झाल्याने संपूर्ण ट्रक वर करंट उतरुन ऊसाच्या ट्रकने पेट घेतला व चालक संतोष मोटे हे जागेवर शॉक बसून मृत झाले ही खबर वाऱ्यासारखी पसरल्याने संगमनेर साखर कारखान्यामधून तातडीने अग्नीशामकला पाचरण करण्यात आल्याने पुढील होणारे मोठे नुकसान टळले मात्र दुर्दवी चालक संतोष मोटे हे जागेवरचं शॉक बसून मृत झाले.

 

चौकट

रस्ता क्रॉस करुन विद्युत वाहीनीमुळे मोठ्या वाहतुक दारांना मोठा त्रास होत असून निर्माण झालेल्या झाडा – झुडपामुळे ताराही लक्षात येत नाही

Leave a Comment