मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
मकर : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.
