शिंदे गटाच्या राहुल कनाल (rahul kanal) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी कोरोना काळात सामानाच्या ऑफिसमध्ये 16 आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत संजय राऊत यांनी आपण मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असल्याच सांगितलं होतं असा खळबळजनक दावा राहुल कनाल यांनी केला.
याबाबत सामना ऑफिसचं सीसीटीव्ही फूटेज आणि दोघांचा तीन वर्षांचा सीडीआर चेक करावा असं आव्हानही राहुल कनाल यांनी दिले आहे.
