पिंपळगाव खांड पाणी प्रश्नी नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको, संगमनेरात तातडीची बैठक

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडीपर्यंत सोडण्यात यावे या मागणीसाठी जांबुतचे उपसरपंच १ मार्चपासून आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरीही शासन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठच्या टंचाईग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांची साकूर येथे नुकतीच बैठक पार पडली.

सदर बैठकीत या मागणीची तात्काळ दखल घेतली नाही तर गुरूवार दि. ७ मार्च रोजी एकोणीस मैलावरील नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचे निवेदनही प्रशासनाला दिले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासन खडबडून जागे झाले असून बुधवार दि. ६ मार्च रोजी दुपारी १.३० वा. मा. उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग संगमनेर यांचे अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात बैठक आयोजीत केली आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment