महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे. तसं झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील.
दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील. पण दुसरीकडे भाजपा मनसेला एकच जागा देणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
