बापरे! महिलांनो दुचाकीवर बसताना सावधान, घडलीय धक्कादायक घटना….

शिक्रापूर – मुखई (ता. शिरूर) येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याचे महिलेचा मृत्यू झाला. रेणुका बाबुराव वोइंदे (वय २८, रा. धामारी, ता. शिरुर), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

धामारी येथील पाबळ शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे व रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीहून चाललेले होते.

मुखई गावातील मुक्ताई मंदिराजवळ आल्यानंतर रेणुका यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून गुंढाळला गेल्याने रेणुका या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. यावेळी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात आणले.

डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. हनुमान पवार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Comment