साकूर परिसरावर शोककळा! माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव शेंडगे यांचं निधन 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील शिवाजीराव आनंदराव शेंडगे (वय ६५) यांचं दुखःद निधन झाले आहे. वार – गुरूवार दि. २७ जून रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ते एका आजाराला झुंज देत होते. मात्र अखेर त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातू असा मोठा परिवार आहे.

शिवाजीराव शेंडगे यांच नाव पठार भागासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात परिचित आहे. राजकीय क्षेत्रात त्यांची आक्रमक भूमिका, भाषणे लक्ष वेधून घेत होते. ते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते. तसेच ते कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले व्यक्तीमत्व होते. तसेच शिवाजीराव शेंडगे पंचायत समिती सदस्य देखील म्हणून राहिले आहे. बिरेवाडी गावातील विकासकांसाठी त्यांचं मोलाचे सहकार्य लाभले आहे. पठार भागातील बुलंद तोफ म्हणून शिवाजीराव शेंडगे यांची ओळख होती. पण आज तीच तोफ हरपली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे

Leave a Comment