मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) येथील अंगणवाडी क्रमांक: १ च्या सेविकेचे शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम करत असताना अंगणवाडीतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आज (बुधवार) सकाळी ११ वाजता ही घटना घडली. सौ. सुरेखा रमेश आतकरे (वय ४८) असे त्यांचे नाव आहे.
कामावरतीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत सृजनशील आणि शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शासनाकडून या निराधार झालेल्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
