कोलंबो : श्रीलंकेत क्रिकेटरची मंगळवारी रात्री त्याच्या घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर असलेल्या धम्मिका निरोशन याच्या हत्येने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने निरोशनच्या घरी घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. निरोशन पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता.
धम्मिका निरोशनची हत्या का करण्यात आलीय याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची नोंद पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात आरोपीने १२ बोर बंदूक घेऊन आला होता अशी माहिती समोर आलीय.
निरोशन ४१ वर्षांचे होते. त्यांनी अंडर १९ क्रिकेटमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं होतं. २००० मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पणाचा सामना खेळला. दोन वर्षे अंडर १९ मध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळलं. त्यांनी दहा सामन्यात संघाचं संघाचं नेतृत्व केलं होतं. निरोशन वेगवान गोलंदाज होता आणि फलंदाजही होता. त्यानं २००२ मध्ये अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाच डावात ७ विकेट घेतल्या होत्या.
धम्मिका निरोशनला जॉन्टी नावानेही ओळखलं जात होतं. त्यानं १२ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यात त्याच्या नावावर २६९ धावा आणि १९ विकेट होत्या. तर ८ लिस्ट ए सामनेही खेळले होते. ८ सामन्यात ४८ धावा आणि ५ विकेट घेण्याची कामगिरी केली होती.
