तर लाकडी बहिण योजनेचे १५०० रूपये तुमच्या खात्यातून परत घेणार…..

लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने (Mahayuti) महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचं (CM Ladki Bahin Yojana) प्रमाणपत्र वितरण सोहळा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं.

‘आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेच्या 1500 रुपयांचे 3 हजार करू, त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार’ असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. ज्याचं खाल्लं त्यासाठी जागलं पाहिजे, सरकार देत राहतं, पण सरकारला आशिर्वादही दिला पाहिजे असंही रवी राणा यांनी म्हटंलय. रवी राणा यांचं वक्तव्याने आता एकच खळबळ उडाली आहे. या योजनेवरुन विरोधकांनी आधीच सरकारवर आरोप केले आहेत.

Leave a Comment