युवा शक्तीला योग्य दिशा देण्याची गरज – डॉ.अनुराधा खेमनर

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मूल्य व मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. सर्जनशील अशा युवाशक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे. एच.आय .व्ही / एड्स ही 21व्या शतकात संपूर्ण मानव जातीला एक आव्हान आहे. सध्या संपूर्ण जगात सुमारे 50 दशलक्षपेक्षा जास्त स्त्री-पुरुषांना एड्स या अतिसूक्ष्म विषयाची बाधा झालेली आहे. जागतिक आवरणानुसार 85% एड्सचे रुग्ण 15 ते 49 या वयोगटातील आहे, म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवाशक्तीला योग्य दिशा देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा खेमनर यांनी केले. 

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड, साकुर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा खेमनर, मराठी विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय आसवले, ग्रंथालय प्रमुख प्रा.शंकर राशीनकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हतू खेमनर उपस्थित होते.

तसेच यावेळी ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय आसवले म्हणाले की, शब्दांचे मोल जपलं की आयुष्य ही अनमोल होतं. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणाबरोबर निरंतर शिक्षण देखील आवश्यक असते. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी जनतेला व विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले पाहिजे. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या पुस्तकाचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या समोर मांडले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड म्हणाल्या की, युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागृत केले तर जगात विविध पातळण्यावर असलेली संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्याची युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप, प्रा.रंजीत गिरी, प्रा.पोपट खेमनर, प्रा.योगेश साळुंके, प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा.गणेश साळुंके, प्रा.लक्ष्मण कातोरे, प्रा.संदिप खेमनर, प्रा.शबाना शेख, प्रा.प्राजक्ता बिडवे, प्रा.जया रक्ते, प्रा.कल्पना शेळके, प्रा.स्वाती सागर, प्रा.स्वाती ढोकरे, प्रा.आरजु शेख, प्रा.शेख मॅडम, प्रा प्रियंका हाके, प्रा.वृषाली डोके, श्री.मनोहर दुरगुडे, श्री. पुंजाहरी वारे, श्री.लक्ष्मण जाधव, श्री.महेश पोखरकर, श्री.भाऊसाहेब बहिरट व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.म्हतू खेमनर यांनी केले. व सूत्रसंचालन प्रा.शबाना शेख यांनी केले तर आभार प्रा.शंकर राशीनकर यांनी मानले.

Leave a Comment