शिंदे गटाच्या ‘या’ आमदारावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्वरचं लायसन्सदेखील रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

“राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता.

या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Leave a Comment