पुणे – नगर महामार्गावर बस पेटली ; ३० प्रवासी…..

खासगी ट्रॅव्हल्सच्या बसची मोठी दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. पुणे-नगर महामार्गावर ही बस पेटली. या बसमधून तब्बल तीस प्रवाशी प्रवास करत होते.

जळगाववरुन शुक्रवारी रात्री प्रवाशी घेऊन ही बस निघाली होती. नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात या बसला शार्टसर्किटमुळे आग लागली. शनिवार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाववरुन लक्झरी बस (क्रमांक MH 29 AW 5455) पुण्यासाठी निघाली होती. बसमध्ये एकूण तीस प्रवासी होते.बस चालक विलास गुलाब जुमडे यांना नारायणगाव येथे आल्यावर अचानक गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आले.

त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व ३० प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली.परंतु या घटनेत बस पूर्ण जळून खाक झाली होती.जळालेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहे.

Leave a Comment