मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कुंभ : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
