मुंबई हादरली! अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा गोळीबारात मृत्यू, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात घडली होती. या गोळीबारानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ४ ते ५ राऊंड फायर करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

वांद्रे येथील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर नेमकं कोणी आणि का गोळीबार केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Leave a Comment