मोठी बातमी! विधानसभेआधी शरद पवार गटाला मोठा धक्का, निवडणूक आयोगाने…..

महाराष्ट्रासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्याचा निकाल लगेचच २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या आधी निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता. यामुळे हे चिन्ह गोठवण्यात यावेत, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती, मात्र निवडणूक आयोगाकडून ही मागणी फेटाळून लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’, हे निवडणूक चिन्ह दिले होते. याच चिन्हावर शरद पवार गटाने लोकसभेत दहा उमेदवार उभे केले होते. यापैकी आठ मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आलेत. तर तुतारी या चिन्हाच्या साधर्म्यमुळे दोन जागा गमवाव्या लागल्या. तर इतर मतदारसंघात देखील या चिन्हामुळे मोठ्या प्रमाणात मतदान दुसऱ्या उमेदवाराला मिळाले.

शरद पवार गटाने उभे केलेल्या दहा मतदारसंघात जवळपास ४ लाखोंच्या वर अधिक मतदान हे पिपाणी या चिन्हाला मिळाल्याने त्याचा फटका पवार गटाला बसला. यामुळे हे चिन्ह गोठवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु ती आयोगाने फेटाळून लावली आहे.

Leave a Comment