नगर तालुका – सार्वत्रीक विधानसभा निवडणुक व मतमोजणी प्रक्रिये दरम्यान सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्यीतील तीन गुन्हेगारांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हददीतील दत्तात्रय ऊर्फ देवराज दिलीप भालसींग (रा. शहापुर ता.नगर), अक्षय ऊर्फ भावडया विष्णु भिंगारदिवे (रा. दरेवाडी ता. नगर), अभिषेक ऊर्फ अभि अशोक शेलार (रा. भिमनगर, पाथर्डी रोड भिंगार) अशी हददपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबतचा आदेश प्रांताधिकारी सुधिर पाटील यांनी पारीत केल्याने सदर हददपार इसमांना तात्काळ नगर जिल्हयाचे हददीचे बाहेर सोडण्यात आले आहे.
सदरची कारवाई स. पो. नि. जगदीश मुलगीर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, चंद्रकांत माळोदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनार, पो.हे.कॉ. दिपक शिंदे, संदीप घोडके, रवी टकले, पाडुंरग बारगजे, दत्तात्रय मोरे, गोविंद गोल्हार, महिला पो.हे.कॉ. मीना गहिले, पो.कॉ. प्रमोद लहारे, समीर शेख यांनी केली आहे.
