महाराष्ट्रात सरकार कुणाच येणार? मुख्यमंत्री कुणाचा होणार? राज ठाकरेंनी वर्तवली “ही” भविष्यवाणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येणार? कुणाचा मुख्यमंत्री होणार? याबाबत मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे.

विधानसभेनंतर महायुतीचं सरकार येईल. मनसेच्या साथीनं भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं म्हणत सत्तेत सहाभागी होण्याचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

राज ठाकरे म्हणाले, “राज्यात महायुतीचं सरकार बनेल. तीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं पारडे जड असल्याचं वाटत होते. हरियाणाच्या निवडणुकीनंतर वातावरण बदललं आहे. पण, युतीसाठी इतकं सोप्पही नाही. तसेच, मनसेच्या साथीनं भाजपचा मुख्यमंत्री बनेल, असं वाटतंय.”

यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. “असा प्रकार कोणत्याही पक्षासोबत होऊ नये. मी अशी गोष्ट केलेली नाही. मी शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा शक्य असूनही आमदार फोडलो नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला, तरी चालेल. अशा प्रकारे फोडाफोडी करून कधीही सत्ता नको,” असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

Leave a Comment