एक्झिट पोलनंतर आता सट्टाबाजाराचाही अंदाज आला समोर, महायुती की मविआ? कुणाची सत्ता येणार..

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले असून नावाजलेल्या सात संस्थांपैकी पाच संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

याचदरम्यान, एक्झिट पोल व्यतिरिक्त सट्टा बाजारही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही करडी नजर ठेवून आहे. बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन बेटिंग बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत.

बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराचा अंदाज काय?

बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराच्या अंदाजानूसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोटे पक्षही आपली छाप सोडू शकतात, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

फलोदी सट्टा बाजारचा अंदाज काय?

आता फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालांविषयी भाकीत केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो. महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे. भाजपला 87 ते 90 जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागताना दिसत आहे.

Leave a Comment