राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपलं आणि त्यानंतर विविध एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर महाविकास आघाडीही सत्तेच्या नजिक जाताना दिसतेय. त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा लढवणाऱ्या काँग्रेसला किती जागा मिळतील याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात काँग्रेस हा भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला राज्यात 28 ते 63 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अजित पवार गटाला 14 ते 26 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाकरे गटाला 21 ते 44 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
