महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील निवडणूक पार पडल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला भगदाड पाडणारी बातमी समोर आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात तर महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झाल्यानंतर 24 तासांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत.
आज मध्यरात्रीपासून गॅसचे दर वाढले आहेत. मात्र हे घरगुती स्वयंपाक गॅसचे दर नसून सीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा गॅस विक्री करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने केली आहे.
किती रुपयांनी महाग झाला गॅस?
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली आहे. आजपासून सीएनजी गॅस प्रति किलोमागे 2 रुपयांनी वाढला आहे. या दरवाढीमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचे दर 77 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सीएनजी वाहन मालकांबरोबर रिक्षाचालकांच्या खिशाला खड्डा पडणार आहे.
