महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला……

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस झाले आहेत. महायुतीला निवडणुकीत दणदणीत यश मिळालं, तरीही अजून मुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?

याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे, त्यातच आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे. या नेत्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्याचं नावच सांगितलं आहे. पक्षाचा गटनेता ठरवण्यासाठीची बैठक 2 किंवा 3 सप्टेंबरला होईल, असंही या नेत्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआयसोबत बोलताना सांगितलं आहे. दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करतील, असं स्पष्ट केलं होतं. ‘पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही वरिष्ठांनी या नावावर शिक्कामोर्तब करण्याची वाट पाहत आहोत’, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.

Leave a Comment