मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
मीन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
