पारनेरमध्ये वाड्यावस्त्यांवर पोहचली कृती समिती अभियान, भूमिपुत्रला वाढता प्रतिसाद 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेने दुष्काळी गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विडा उचलला आहे. तसेच हक्काचे पाणी मिळण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे कृती समिती अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाला अक्षरशः शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच काळेवाडी, लांडगेवाडी, गोडसेवाडी, काकणेवाडी या गावात देखील कृति समितीची स्थापना करण्यात आलीय. वाड्या वस्त्यांवरील शेतकरी बांधव या अभियानात स्वखुशीने सहभागी होत आहेत. ११४ गावांमध्ये ही कृती समितीची स्थापना करण्यात येणार असून बऱ्याच गावांमध्ये कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण दुष्काळी गावांमध्ये कृती समितीची स्थापना करण्याचा उद्देश पुर्ण होणार आहे.

गावोगावी शेतकऱ्यांची एकजूट होत आहे आहे. त्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची ताकद वाढत चालली आहे. संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यात हजारो शेतकरी एकजूट होताना दिसत आहे.

यावेळी बाळशिराम पायमोडे, अन्सार पटेल, अरुण बेलकर, प्रवीण खोडदे, बाळासाहेब वाळुंज, सुनीलशेठ तांबोळी, रामदासशेठ दाते, गिताराम वाळुंज, सचिन घुले, रमेश कळमकर, ऋषिकेश कळमकर, मच्छिंद्र गायखे, वसंत गायखे, बाळासाहेब गायखे अनिल तांबोळी, सुभाष भोसले, सुरज मगर, देवराम गायखे, चंदू शिंदे, तुळशीराम भोसले, दत्ता फटांगरे, सरपंच पोपट दरेकर, गोविंद गायके, भगवंता भोसले, सुरेश शिंदे, ऋषी गायखे, अनिकेत गायखे, संजय जगताप, तुषार बेलकर, उद्धव चौधरी, शुभम गायकवाड, प्रदीप चौधरी, सुदर्शन भोसले, बाळासाहेब बेलकर, वसंत बेलकर,रावसाहेब वाळुंज, सुनील पुरी, सुदाम पवार, दत्तात्रय वाळुंज, भीमा वाळुंज, बापू वाळुंज, मारुती वाळुंज, संपत वाळुंज, सत्यवान वाळुंज, राजु रोकडे, रामनाथ वाळुंज, ओमकार पुरी, संजय पवार, पोपट वाळुंज, सूर्यभान वाळुंज, महेश वाळुंज, संपत वाळुंज, नामदेव वाळुंज, दगडू वाळुंज, उमाजी रावबा वाळुंज, किसन वाळुंज, सुनील वाळुंज, संदीप वाळुंज, मंजाबापू वाडेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment