संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) गेल्या काही दिवसांपासून साकूर परिसरात बिबट्यांनी अक्षरशः धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
तसेच बिबट्या भर दिवसा संचार करत असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले असले तरी आणखीन बिबटे परिसरात संचार करताना दिसत आहेत.
नुकतेच मांडवे बु येथील शेतकरी भिमाजी चिमाजी धुळगंड हे शुक्रवारी सायं 5 वाजेच्या सुमारास शेतामध्ये शेळ्या चारत असताना बिबट्याने भर दिवसा हल्ला करत शेळीचा जागीच फडशा पाडला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलीय.
