घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून द्यावी – आ. खताळ

संगमनेर(DSNews24) घरकुलाचे बांधकाम करताना वाळू मिळण्यासा लाभार्थींना अनेक अडचणी आल्या होत्य. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाच्या बांधकामा साठी वाळू मोफत देण्याचे धोरण जाहीर केले आहे त्यामुळे घरकुलांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी सूचना प्रांतांधिकारी आणि तहसीलदारांना देत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

संगमनेर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ७ हजार १४५ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वर्ग घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्याचे प्रमाणपत्र आ अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपअभियंता गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता हितेंद्र गव्हाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश घोलप गुंजाळवाडी चे भाजप नेते रोहिदास गुंजाळ, कृषी अधिकारी वाळीबा उघडे आणि रामराव कडलग, विस्तार अधिकारी मदन शेवाळे, राजेंद्र कासार, काशिनाथ सरोदे, सदानंद डोखे, श्रीमती भाग्यश्री शेळके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व लाभार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.

आ खताळ म्हणाले की, या देशातील सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. परंतु यापूर्वीच्या काळात संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपात राजकारण झाले होते परंतु येथून पुढील कालावधी मध्ये घरकुल वाटपाचे काम पारदशींपणे केले जातील.ज्याला खऱ्या अर्थाने घर कुलाची गरज आहे. आशा चलाभार्थ्यांना घरकुल दिले जातील. येथून मागे मंजूर झालेल्या घरकुलांचे कामे पूर्ण करण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु आता येथून पुढील काळात घरकुले तयार करताना कुठली अडचण येणार नाही. याची मी काळजी घेईल असाही विश्वास आ खताळ यांनी घरकुल लाभार्थ्यांना दिला. प्रस्ताविक आणि स्वागत प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन कक्ष अधिकारी राजेश तिटमे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले

चौकट

संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहा मध्ये एकाच वेळी पुणे येथून केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर घरकुलांचा पहिला टप्पा अनुदान वर्ग करण्यात आले त्यावेळी उपस्थित घरकुल लाभार्थ्यांना केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मार्गदर्शन केले

Leave a Comment