साकूरमधील 153 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मंजुरीचे पत्र वाटप

साकूर – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा -2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वाटप व 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सव कार्यक्रम आज बालेवाडी क्रिडा संकुल, पुणे येथे शनिवार दि.22 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृह व सहकारमंत्री मा.ना.अमित शाह यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे, मा.ना.अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे सहप्रक्षेपण सर्व ग्रामपंचायतींमध्ये करण्यात येऊन त्या त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना मंजुरीचे पत्र वाटप व पहिला हप्ता वितरण वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी साकूर ग्रामपंचायत येथे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात दुरदृष्य प्रणाली द्वारे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी साकूर येथील तब्बल 153 लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत घरकुल मंजुरीचे पत्र वाटप तसेच पहिला हप्ता वितरण करण्यात आले. लाभार्थींच्या खात्यात लगेचच 15,000/- रु पहिला हप्ता थेट जमा झाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसुन येत होते.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्यातील महायुती सरकारकारच्या माध्यमातुन सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवुन देण्याची ही महत्वाकांक्षी योजना आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पा.खेमनर, पठार भागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, राष्ट्रवादीच्या सौ.अमृता कोळपकर, सहदेव जाधव, ग्रामविकास अधिकारी श्री.नागेश पाबळे ई.उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रऊफ शेख यांनी केले तसेच त्यांनी महायुती सरकारच्या वतीने दिल्या जाणार्‍या घरकुल योजनेची माहीती देऊन राज्य व केंद्र सरकारचे व संगमनेरचे आमदार अमोल खताळ पा. व अहिल्यानगरचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे आभार मानले.तर ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे, सभापती शंकर पा.खेमनर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ.अमृता कोळपकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment