नगर ब्रेकिंग! भरधाव कार डिव्हायडरला धडकून पेटली, पोलिस कर्मचाऱ्यासह २ जणांचा होरपळून मृत्यू 

जामखेड शहरातील बीड रोडवर भीषण अपघात घडला. इर्टिगा कार रस्त्याच्या डिव्हायडरला आदळून पेट घेतल्याने गाडीत अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला.या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

ही दुर्घटना २४ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नवले पेट्रोल पंप आणि नायरा पंपाच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तसेच अग्निशामक दलाला कळवले.

अपघातग्रस्त वाहन सीएनजीवर चालणारी इर्टिगा होती. अपघातानंतर गाडीच्या टाकीने पेट घेतल्याने संपूर्ण गाडी आगीत होरपळून गेली. गाडीच्या लॉकिंग सिस्टममुळे आत असलेल्या दोन व्यक्तींना बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत जामखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी नरेश गुडवाल (३५) आणि साईनाथ पॉन शॉपचे मालक महादेव काळे (२८) यांचा जागीच मृत्यू झाला.

जामखेड नगरपरिषद अग्निशमन दलाचे आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख यांनी आग विझवण्यासाठी तब्बल एक तास प्रयत्न केले, मात्र गाडी पूर्ण जळून खाक झाली होती.

Leave a Comment