पिंपळगाव खांड पाणी प्रश्न पेटणार, शिंदोडीपर्यंत पाणी नाहीच ; संतोष वाडेकर आक्रमक… 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाच्या लाभ क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या जांबुत, टेकडवाडी, साकुर, मांडवे या बंधाऱ्यांचा धरण लाभ क्षेत्रात समावेश करावा ही गेली अनेक वर्षांपासून मुळा नदीकाठच्या संगमनेर व पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र आजपर्यंत शासनस्तरावरून यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संगमनेर व पारनेर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 

तसेच नुकतेच पिंपळगाव खांड धरणातून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. तसेच ते पाणी शिंदोडीपर्यंत सोडण्यात यावे यासाठी दोन दिवसांपूर्वी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची लोणी येथे जाऊन शेतकऱ्यांनी भेट घेतली होती. तसेच ते पाणी खाली देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र 28 फेब्रुवारी रोजी अकोले मतदारसंघातील आभाळवाडीपर्यंत पाणी आल्यानंतर धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यामुळे पारनेर व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेली पिके सोडून देण्याची वेळ येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान पिंपळगाव खांड धरणाच्या लाभ क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून लवकरच पुढील दिशा ठरवून पाण्यासाठी मोठं जन आंदोलन उभारणार असल्याचा एल्गार पुकारत न्यायालयात जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते संतोष वाडेकर यांनी DSNews24 बोलताना दिली आहे.

1 thought on “पिंपळगाव खांड पाणी प्रश्न पेटणार, शिंदोडीपर्यंत पाणी नाहीच ; संतोष वाडेकर आक्रमक… ”

  1. सध्या पालकमंत्री म्हणतील तसे पुढील काही वर्षांनी पूर्ण परिस्थिती बदलेली असेल मग संगमनेर म्हणेल तसे त्यातही दुर्गम ग्रामीण भागातील जनता म्हणेल तसे कारण पुढील पंचवार्षिकला आमच्या Sakur परिसरातील उमेदवार उभा केला जाईन तरुण सर्वसामान्य लोकांना आवडणारे mg कसे होईल ते बघा .. सकुरगट म्हणेल तसे

    Reply

Leave a Reply to महेश क Cancel reply