विरोधी बाकांवर शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव,आदित्य ठाकरे,आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेता बाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिले जाणार आहे. हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही. ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीत विरोधीपक्षनेते पदासाठी कोणाच नावं अंतिम करायचा? यावर आमदारांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला तर विधानपरिषदेत विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर याचा काही परिणाम होईल का, याबाबत दोन्ही सभागृहातील आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
