कौठेमलकापुर येथील शेख परिवाराला आ.अमोल खताळांनी दिला धीर, आमदारासमोरच अश्रू अनावर…

संगमनेर(DSNews24 ) कौठे मलकापुर येथील युवक कार्यकर्ता श्री.शकील अकबर शेख यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने वयाच्या 37 व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,लहान मुले व आई, मोठे बंधु लालु शेख असा परिवार आहे. नेहमी हसतमुख आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असल्याने परिसरातील सर्वांशीच त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या अकाली निधनाने संपुर्ण पठारभागात हळहळ व्यक्त होत आहे.

आमदार अमोल खताळ यांनी आज कौठे मलकापुर येथे शेख परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी लालु शेख व त्यांच्या मातोश्रींना अश्रु अनावर झाल्याने व शकील शेख यांच्या लहान मुलींना पाहुन आमदार अमोल खताळ यांच्यासह उपस्थित सर्वच भावुक झाले होते. आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबियांना धीर देत आपण पाठीशी असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, गुलाबराजे भोसले, हरिभाऊ गिते, कांतिलाल गिते, नवनाथ गंभीरे, गणेश डोंगरे, गोरक्ष बागुल, कैलास डोंगरे, संदीप खिल्लारी, प्रमोद साळुंखे इ.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment